Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघात आमचे नेते पॉवर फुल अनेकाची होतोय हवा कुल ? -लक्ष विधानसभेचे !!

      माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक पासून मागासलेला असल्यामुळे ह्या मतदार संघात जनतेला विकासाची गरज असून गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचा वाटेल तेवढा विकास होत नसल्यामुळे जनता नेते मंडळीवर टीकेचा वर्षाव करीत असल्यामुळे या मतदार संघाचा विकास करण्यासाठी कोण पुढाकार घेईल असा ही प्रश्न चर्चेला जात आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा मा.सार्वजनिक बांधकामंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे काम करणारे दोन बलांडे लशरल आगामी काळातील विधानसभा मतदार संघात विरोधकाचे दोन हात बघणार असल्यामुळे आमचे नेते पावरफुल अनेकांची होतोय हवा कुल ? असे ही सदरच्या कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहेनायगाव विधानसभा मतदार संघाची माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ काम करणारे शेतकऱ्यांचे हितचिंतक तथा शेतकरी नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांनी सुद्धा नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भावी आमदार असल्याचे ही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहेत 

Post a Comment

0 Comments