विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
नायगाव तालुक्यातील रातोळी येथील कै. बालाजीराव मारोतराव रातोळीकर पोलीस पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्त आ. राम पाटील रातोळीकर यांच्यावतीने रातोळी येथे बुधवार दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्रातील प्रख्यात राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. सौ. सुनिताताई आंधळे यांचा सुश्राव्य प्रबोधनपर कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे
या निमित्त नायगाव तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासणारे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी आपले वडिल बालाजीराव मारोतराव रातोळीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुकन्या समृद्धीयोजने अंतर्गत १००० मुलींची खाती काढून दिली असून त्याची पासबुक वितरण ही या निमित्त होणार आहे
दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार्या सोहळ्यात प्रातिनिधीक स्वरुपात या योजनेतील लाभार्थी खातेदारांना मान्यवरांच्या हस्ते पासबुक सुपूर्द केले जाणार आहेत.
आई-वडिलांच्या स्मरणार्थ केलेले समाजोपयोगी कार्य, दीन-दुबळ्यांना केलेली मदत हाच पुण्यकाळ आणि ईश्वरसेवा असते.
हा दृष्टिकोन मनाशी बाळगून आमदार राम पाटील रोतळीकर यांनी हा आदरांजलीपर पुण्य सोहळा आयोजित केला आहे.या सोहळ्यास पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहून सुश्राव्य किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.राम पाटील रातोळीकर व रातोळीकर परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

0 Comments