काला म्हणजे देव व भक्त यांच्यातील प्रेमाच प्रतीक होय.देवा ने आपल्या भक्त गण व संवगडी यांना एकत्रित आणून आपल्या प्रेमाच्या भक्तिरसात न्हाऊन जाण्यासाठी ही काल्याचे प्रयोजन केले.असे प्रतिपादन ह.भ.प.विशाल महाराज खोले
घुंगराळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता प्रसंगी काल्याचे कीर्तनातून बोलताना व्यक्त केले.सात दिवसा पासून चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली
महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह , श्री क्षेत्र खंडोबा मंदिर, घुंगराळा च्या सप्ताह ची सांगता रविवार दि १२ फेबुरवारी रोजी करण्यात आली
अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र खंडोबा मंदिर, घुंगराळा सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी काल्याचे किर्तन ज्यांची अमृत वाणी ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने अफाट श्रोते गण एकत्रित येतात असे, महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार, ह.भ.प. विशाल महाराज खोले यांची खंडोबा चरणी किर्तनरुपी सेवा झाली..या वेळी ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी किर्तनातुन श्रोते मंडळींची मने जिंकली..या वेळी खंडोबा मंदिराचा अवघा परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला.होता.
या वेळी गावकऱ्यांच्या वतीने गावचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचीटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यातसह राष्ट्रवादी कॉग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडूरे यांनी ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचा व्यासपीठावर शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार केला. मंडपात जागा शिल्लक नसल्याने पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मंडपाच्या बाहेर उभे राहून ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचे किर्तन ऐकले. या वेळी पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्तांची उपस्थिती होती
सप्ताह कालावधीत सलग सात दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळे नामवंत किर्तनकार यांनी किर्तन केले.सात दिवस भजनीमंडळ,विणेकरी, सेवेकरी यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन गावातील अन्नदात्यांनी केले
शेवटच्या दिवशी कालयाच्या किर्तनास १० ते १२ हजार भक्तांची उपस्थिती होती. मंडपात जागा शिल्लक नसल्याने पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मंडपाच्या बाहेर उभे राहून ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचे किर्तन ऐकले आहे
या वेळी पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्तांची उपस्थिती होती. यानंतर लगेचच महाप्रसादाचा कार्यक्रम झाला महाप्रसादवाटप करण्यात आला.संपूर्ण गावकऱ्यांचया वतीने या सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अतिशय शिस्तबद्ध ,उत्तम नियोजनातून हा सप्ताह कार्यक्रम पार पडला.
या सप्ताह कार्यक्रमाची, व उत्कृष्ट नियोजनाची चर्चा तालुक्यात होत असून सर्वत्र या सप्ताह चे कौतुक होत आहे.


0 Comments