Header Ads Widget

बरबड्याच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या इस्रोच्या परीक्षेत ६९ मुली तर ५६ मुलांनी दिली परीक्षा -

          माधव पवार
तंत्रज्ञानाच्या युगात व शिक्षण क्षेत्रात असो की कोणत्याही क्षेत्रात असो स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुलापेक्षा मुलीची संख्या जास्त असल्याने देश वेगळ्या पद्धतीने झेप घेत असल्याचे दिसून येत आहे

नायगाव तालुक्यातील बरबड्याच्या जिल्हा परिषद केंद्रित प्रार्थमिक शाळेत दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या इस्रोच्या परीक्षेत इयत्ता पाचवीच्या विध्यार्थासह सहावी व सातवीच्या एकूण १२५ विध्यार्थीनी परीक्षा दिली आहे
तालुक्यातील बरबडा येथे या परीक्षेत मुलापेक्षा मुलीची संख्या जास्त होती मुलाची संख्या ५६ तर मुलीची संख्या ६९ एवढी होती शालेय विद्यार्थ्यां मध्ये अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञाना विषयी जास्तीची जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने एक मोफत अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी आणला आहे अशी माहिती शाळेचे शिक्षक जि आर मार्गेपवार यांनी माहिती दिली आहेजिल्हा परिषद केंद्रीय प्रार्थमिक शाळा बरबडा येथे
इस्रोची परीक्षा देण्यासाठी अंतरगाव शाळेचे ५२ विद्यार्थी
 इज्जतगाव शाळेचे २० विद्यार्थी पाटोदा शाळेची ३१ विद्यार्थी वजीरगाव शाळेचे सहा विद्यार्थी मनूर शाळेचे सह विद्यार्थी  रुई खुर्द शाळेची ५ विद्यार्थी रुई बुद्रुक चे दोन विद्यार्थी टाकळीचे तीन विद्यार्थी असे एकूण १२५ विध्यार्थी इस्रोच्या परीक्षेला बसले होते 

बरबडा येथे घेण्यात आलेल्या इस्रोच्या परीक्षेत १०० गुणाचा पेपर तर एकूण ५० प्रश्न होते एका प्रश्नाला दोन मार्क होते या परीक्षेला एकूण १२५ मुल व मुली बसले होते यात ६९ मुली ५६ मुनी लेखी परीक्षा दिली असून यावेळी प्रवेशक म्हणून शिक्षक आणि काम पाहिले यात यु एन मुंडकर के.डी पचलींग, एम आर अंबुलगे आर एस व्यंकटपुरवार एम.डी सूर्यवंशी डी आर खिंडे यांनी काम पाहिले आहे 

Post a Comment

0 Comments