Header Ads Widget

इयत्ता दहावीच्या परीक्षा दोन मार्च पासून चालू होत असल्याने जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथे शांततेत परीक्षा पार पडणार मुख्याध्यापक बोडके यांची माहिती

         माधव पवार
इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा दिनांक २ मार्च २०२३ पासून चालू होत असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी सज्ज असल्याने ज्या ज्या ठिकाणी बोर्ड आहेत त्या त्या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापका कडून अतिशय उत्तम परीक्षा सुरळीत पार पडाव्यात म्हणून प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहेतअशाच पद्धतीने जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथील शाळेचे मुख्याध्यापक बि आर बोडके यांनी इयत्ता एसएससीच्या परीक्षा शांततेत पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा ही नांदेड ते नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे या शाळेचा सेंटर क्रमांक ( ५२७२ ) असून या शाळेत परीक्षा देणारे विद्यार्थ्यांची संख्या २०७ व बँच २०७ लावण्यात आले असून या परीक्षेसाठी एकूण ९ हॉल तयार करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बोडके यांनी दिली आहेतालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथे दरवर्षी इयत्ता एस सी सी ची परीक्षा पोलीस बंदोबस्तात घेण्यात येते व विद्यार्थी ही कॉफी मुक्त अभियानाच्या चौकटीत बसून इयत्ता दहावीची परीक्षा देतात परीक्षा केंद्राच्या परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळ्यांच्या वतीने बंदोबस्त मागविला जातो

जिल्हा परिषद घुंगराळा येथे परीक्षा केंद्रावर परीक्षा शांतते व कॉपीमुक्त झाल्या पाहिजे म्हणून गटशिक्षणाधिकारी नायगाव यांच्या वतीने तालुकास्तरातून सदरच्या प्रवेशक शिक्षकांची नेमणूक केल्या जात आहेजिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथील शाळेवर केंद्र संचालक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बी आर बोडके हे असणार आहेत सहाय्यक म्हणून कोमवाड एस जी राहणार असल्याची ही माहिती शाळेचे मुख्याध्यापक बोडके यांनी दिली आहे

सदरच्या परीक्षा दरम्यान परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाकडून म्हणजे महसूल प्रशासना कडून एक बैठे पथक नेमविण्यात येणार असून त्याच बरोबर शिक्षण विभागाच्या वतीने सुद्धा एक बैठे पथक तयार करण्यात आल्याची सुद्धा माहिती मुख्याध्यापक बोडके यांनी सदरची माहिती दिली आहे


Post a Comment

0 Comments