Header Ads Widget

बरबडा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये बारावीची परिक्षा शांततेत

बरबडा :- किरण हणमंते 
नायगाव तालुक्यातील बरबडा या ठिकाणी बारावी परिक्षा चे केंद्र आहे. या केंद्रावर एकदम शांततेत परीक्षा सुरु झाल्या आहेत. या शाळेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी यांच्या नियोजनाखाली व देखरेखखाली शांत वातावरणामध्ये हि परिक्षा पार पडली  आहे

या केंद्रात जवाहरलाल नेहरू विद्यालय आणि  कापशी गुंफा येथील संत बाळगीर महाराज येथील विद्यार्थी एकूण ६४४ परीक्षार्थी होते. त्यामध्ये ६२९  मुला - मुलींनी परिक्षा दिली. १५  विद्यार्थी अनुपस्थित होते त्यासाठी एकूण २६ हॉल होते प्रत्येकी हॉल मध्ये २५ विद्यार्थी आणि एका हॉल मध्ये १९ विध्यार्थी होते.

यामध्ये केंद्रप्रमुख म्हणुन हिवराळे हे आहेत. त्यांना सहकार्य म्हणुन टि. जे. तगडपल्लेवार, सदाशिव कवळे, प्रा. शिवाजी हंबर्डे, प्रा. मुदखेडे, प्रा. वाघमारे, प्रा. सोळंके,राज धर्माधिकारी यांनी केले.या केंद्रात सकाळ पासूनच बैठे पथक होते

हि परीक्षाला अगदी शांत वातावरणात झाल्या आहेत. कोरोना च्या काळ संपला तस हि पहिली परिक्षा भयमुक्त व शांत वातावरणामध्ये पार पडल्या आहेत नांदेड जिल्ह्यात प्रथम कॉपी मुक्त अभियान राबविणारे  जिल्हाधिकारी डॉ श्रीकर परदेशी सध्या नांदेड पॅटर्न अख्खा महाराष्ट्र भर राबविणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या वेळेला नक्कीच त्यांची आठवण झाली म्हणायला हरकत नाही. या पॅटर्न चा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे मनापासून अभ्यास करतील असे पालक वर्गातून चर्चा होत आहे.

परिक्षा चालु असुन नसल्या सारखे शांत वातावरण दिसत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलिस उपनिरीक्षक संजय अटकोरे, पोलिस उपनिरीक्षक संजय निखाते, पोलिस कॉनस्टेबल खंदारे आणि होमगार्ड यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments