Header Ads Widget

जय बजरंग बली मित्र मंडळ यांच्या वतीने पळसपुर येथे शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांना शिवप्रतिमेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न !!


हिमायतनगर : नागोराव शिंदे


तालुक्यातील मोजे पळसपुर येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त पळसपुर येथील जय बजरंग बली मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे 
यामध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे असे प्रबोधन भाषण व्यक्त करून अनेकांचे मन जिंकले आहे यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती डॉक्टर प्रकाश वानखेडे पळसपुर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सदस्य आणि ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होतेया कार्यक्रमाचे आयोजन गजानन गंगाराम वानखेडे दिनेश वानखेडे मारोतराव सूर्यवंशी आदींनी केले होते 
समीक्षा सूर्यवंशी , रुद्र वानखेडे, साई वानखेडे ,सानवी कदम, संस्कृती वानखेडे, श्रुतिका वानखेडे ,शिवराज वानखेडे, कृष्णा माने, संस्कृती देवसरकर नागेश कदम, श्वेता सूर्यवंशी, साक्षी वानखेडे ,जानवी सूर्यवंशी, अस्मिता माने, रोशनी वानखेडे, अर्पिता सूर्यवंशी, प्रीती कदम आदी उपस्थित  होते 

तनवी कदम, प्रांजली माने शिवानी सूर्यवंशी ,तनुजा वानखेडे अक्षरा सूर्यवंशी, प्रतीक्षा सूर्यवंशी, कानोपात्रा वानखेडे ,अशा एकूण २६ विद्यार्थ्यांना वितरण सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे परीक्षा पॅड देऊन त्यांना आज गौरविण्यात  आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्हि डी हुंबे, यादवकुळे ,पोसाणे मॅडम उपस्थित होते

Post a Comment

0 Comments