भारतीय राज्य घटनेचा चौथा आधार स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकाची शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात एका एप्सच्या माध्यमातून नोंदणीचे काम काही महिन्याखाली करण्यात आले होते त्या नोंदणीच्या आधारे मोठया प्रमाणात पत्रकारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे
पत्रकारिता क्षेत्र हे अतिशय सन्मानाचे क्षेत्र असले तरी ग्रामीण भागात पत्रकारिता वरचेवर ढासाळत असल्यामुळे पत्रकारितेच्या नावाखाली जिथे माती मुरुमाचे उत्खलन केल्या जाते त्या ठिकाणी प्रथम पत्रकारच दिसतो यात बोगस पत्रकाराची संख्या जास्त असते सच्च्या पत्रकाराची संख्या फारच कमी दिसत आहे
लोकशाही ज्या पद्धतीने पोखरली गेली असल्याचे सांगण्यात येते पद्धतीने त्याच वास्तवाची पत्रकारिता एक भाग असल्याने लोकशाहीचा हा आधार स्तंभ देखील तसाच पोखरला जाऊ नये वास्तव चित्र नीट समजून लक्षात घेतले पाहिजे स्पष्ट आहे
पत्रकारिता करीत असताना सर्व बाजू तपासून पत्रकारानी वंर्ताकन करण्याची गरज असताना सुद्धा केवळ जिथे मातीचे मुरुमाचे उत्खलन केल्या जाते त्या ठिकाणी खऱ्या पत्रकारा ऐवजी बोगस पत्रकाराची संख्या दिसत असते बोगस पत्रकारानी कोणत्या दैनिकात बातमी प्रकाशित करतात ते त्यांनाच माहीत असते परंतु सर्वांच्या अगोदर मात्र जाग्यावर दिसत आहेत

0 Comments