Header Ads Widget

कृष्णुरच्या सेवानिवृत्त भारतीय सैनिकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंसार

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मोजे कृष्णुर येथील रहिवासी असलेले व भारतीय सैन्य दलात अनेक वर्ष कामगिरी करून सेवानिवृत्त झालेले शिवशंकर जाधव यांच्यावर शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी म्हणजे कृष्णूर येथे त्यांच्यावर दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटानी अंत्यसंसकार करण्यात आले आहे

यावेळी दुःखाच्या डोंगरात असलेले नातेवाईक व गावातील महिला व पुरुष मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते
तालुक्यातील कृष्णूर येथील भारतीय सेवा निवृत्त सैनिक सेवेनंतर राज्याच्या नागरी सेवेत पोलीस भरतीतून पुनर्नियुक्त होण्यासाठी ते नाशिक येथे गेले होते

त्या दरम्यान घराकडे परत येत असताना त्यांचा दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी अंदाजे ९ ते साडे वाजता जालना जिल्ह्यातील अंबड जवळ अपघाती मृत्यू झाला असल्याची घटना गाववासियाना कळताच गावावर शोककळा पसरली होती
कृष्णूर येथील शिवशंकर जाधव हे भारतीय सैन्यातून गेल्या तीन वर्षाखाली सेवानिवृत्त झाले होते परंतु जालना जिल्ह्यातील अंबड जवळ त्याचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि बघता बघता गावावर शोककळा पसरली आहे
भारतीय सेवा निवृत्त सैनिक स्व शिवशंकर जाधव त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, दोन मुले असा परिवार असून शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर कृष्णूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे

यावेळी गावकऱ्याच्या वतीने स्व शिवशंकर जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला व भारतीय सेवा निवृत्त जवान यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून गाववासियानी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे 




Post a Comment

0 Comments