Header Ads Widget

बरबड्यात विद्यमान सरपंचासह व उपसरपंच सौ छायाताई धर्माधिकारी यांच्या माध्यमातून विकास कामाचा धुमधडाका सरपंच माधव कोलगाणे

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून व नेते मंडळीच्या विविध निधीच्या माध्यमातून विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे यांच्यासह उपसरपंच सौ छायाताई दिलीपराव धर्माधिकारी यांचा दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या बरबडा गावात विकास कामाचा धुमधडाका चालू करण्यात आला आहे
सदरचा विकास करण्यासाठी सदरची ग्रामपंचायत सक्षम असल्यामुळे विविध रस्त्यांचे सी सी रस्त्या बरोबर विविध विकास करण्यात आले आहे
तालुक्यातील बरबडा येथील दिलीपराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतचे सरपंच माधवराव कोलगाने व उपसरपंच सौ छायाताई धर्माधिकारी व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य एक दिलाने गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे या सदरच्या बरबडा नगरीत विकास कामाचे श्रीफळ फोडून विकास कामाचा धुमधडाका चालू केला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहेडॉ बाबासाहेब आबेडकर सामाजिक न्याय भवन अनु जाती वस्ती सुधारणा योजनेतून १० लाख रुपये यात सी सी रस्ता,१५ व्या वित्त आयोगातुन सी सी नाली, आमदार राजेश पवार यांच्या निधीतून कृष्णा मंदिरासाठी व सभागृह एकूण १५ लाख रुपये खासदार प्रताप पाटील चिखलीकर १० लाख रुपये सभाग्राहासाठी देण्यात आले ते कामाला सुरुवात करण्यात आली आहे

आ. राजेश पवार यांच्या निधीतून सी सी रस्ता गोविंद नगर येथे सी सी रस्ता व प्रमुख रस्ता जंगीलवाड यांच्या घराकडे सी सी रस्ता करण्यात आला व गावातील नागरिकाला मुबलक पाणी व प्रकाशमय लाईटची व्यवस्थित व्य्वस्था करण्यात आल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत 
गावचा विकास करण्यासाठी विद्यमान सरपंच व उपसरपंच या गावासाठी प्रयत्नशील असल्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती मधून गावचा विकास करण्यासाठी योग मिळाला असल्याचे ही सरपंच यावेळी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सरपंच असे सांगितले की जलजीवन मिशन योजने अंतर्गत हर घर नळ योजना गावातील थोडयाच दिवसात मिळणार असल्याचे ही सांगितले व दलित वस्तीमध्ये सी सी रोड करण्यात आला आहे

या ठिकाणी अतिशय चिखलमय रस्ता अगोदर होता परंतु सरपंच माधव कोलगाने यांच्या माध्यमातून सदरचा रस्ता करण्यात आला असल्यामुळे वार्डातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत

Post a Comment

0 Comments