Header Ads Widget

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस --

मुबंई : नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क :- 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल राधाकृष्णन माथुर यांचा ही राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्याचं पत्रकात म्हटले आहे

कोश्यारी यांच्या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली असून बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत आता झारखंड ऐवजी ते महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत 
महाराष्ट्रा सारख्या संत समाज सुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्य सेवक राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्या करिता अहो भाग्य होते गेल्या तीन वर्षां हून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधी ही विसरता येणार नाही असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे

पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यां मधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे

 "" राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण ? आहेत ""

रमेश बैस झारखंडचे २०२१ पासून राज्यपाल आहेत. २०१९ ते २०२१ या कालावधीत ते त्रिपुराचे राज्यपाल होते

१९९९ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते पर्यावरण आणि वनखात्याचे मंत्री होते

१९८९ आणि१९९६  ते २०१९ या कार्यकाळात ते रायपूर मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले खरे तर त्यांची नगरसेवक ते खासदार येथून त्यांचा राजकीय प्रवास सुरुवात झाला आहे 

Post a Comment

0 Comments