Header Ads Widget

'जबाब दो' आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे रवाना


बिलोली : साहेबराव दावलेकर 

मुंबई येथे आज दि.२२ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या सकल मातंग समाजाच्या वतीने 'जवाब दो' आंदोलनात सहभागी होण्यासाठी बिलोली तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मातंग समाज बांधव दि.२१ रोजी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत .

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील मातंग समाज हा अजूनही विकासापासून कोसो दूर आहे, त्यामुळे मातंग समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर जवाब दो आंदोलन पुकारण्यात आले आहे या आंदोलनात मातंग समाजाच्या वतीने अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास १ हजार कोटी निधी देण्याच्या मागणीसह लहुजी साळवे आयोगाच्या ८४ शिफारशी लागु करण्यात यावे

तसेच अनुसूचित जातीच्या शासकीय नोकरी भरती आरक्षणात मातंग समाजाला लाभ मिळत नसल्याने मातंग समाज हा वरच्यावर पछाडलेल्या अवस्थेत जात असल्याने मातंग समाजासह इतर ५८ जातीचा समावेश असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गात अ ब क ड अशी वर्गवारी करून प्रत्येक समाजाला नौकरी भरतीत संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तात्काळ अ ब क ड लागू करण्यात यावे,

तसेच बार्टीच्या धरतीवर मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आर्टी संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे व अण्णा भाऊ साठे यांचे मुंबई येथील स्मारक व लहुजी साळवे यांचे पुणे येथील स्मारकाला तात्काळ निधी उपलब्ध करून स्मारकाचे काम सुरू करण्यात यावे

 या मागणीसह अनेक मागण्या घेऊन मातंग समाजाच्या वतीने आज दि.२२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर सरकारच्या विरोधात 'जवाब दो'आंदोलन करण्यात येत आहे

या आंदोलनात बिलोली तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातुन हजारोच्या संख्येने मातंग समाज बांधव हे मिळेल त्या गाडीने, रेल्वेने मुंबई रवाना झाले आहेत

येथील होणाऱ्या 'जवाब दो' आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले असल्याचे बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर कुडके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments