नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवारांनी पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात बेताल वक्तव्य करून पत्रकार विषयी खोचक टीकाटिप्पणी करत म्हणाले काही दैनिकांचे संपादक स्वताचे पेपर देखील वाचत नसून फक्त जाहिरातीसाठी काही एजंट वार्ताहरांची नेमणूक केल्याचे विधान करत पत्रकारांना शुभेच्छा देण्या ऐवजी त्यांच्या भावना दुखविणाऱ्या आ.पवारांचे उपस्थित होते हजारो पत्रकारांनी अक्षरशः विरोध करून त्या वक्तव्याचे निषेध करत आ. पवारांचे भाषण रोखले तर काही क्षणात आ.पवारांना व्यासपीठ सोडून जाण्याची पाळी आल्याने संबंध जिल्हाभरातील पत्रकार मध्ये या घटनेची चर्चा होत आहे.
वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळीचा इतिहास असतो. कुठल्याही वृत्तपत्र,हे राजकारण आणि सामाजिक करणाच्या प्रक्रियेला सदैव गती देतात.मात्र नायगावाचे भूमिपुत्र आ.राजेश पवारांनी आपला संपूर्ण कार्यकाळ फेसबुक अन् सोशल मीडियाच्या माध्यमातून घातला असून सकाळी उठल्यानंतर दैनिक सकाळ पेपर वाचतो मात्र त्या दैनिकात माझी बातमी येत नसल्याची स्वता कबुली देणारे आ.पवारांनी नायगाव तालुक्यातील पत्रकारांचा यथोचित सन्मान कधी ही केला नाही
साधी पत्रकार परिषद न घेणाऱ्या आमदार राजेश पवारांनी हजारो पत्रकारांच्या उपस्थिती आक्षेपार्ह वक्तव्य करीत दिवाळी,दसरा,जयंतीनिमित्त उत्साहात काही संपादक एजंट वार्ताहरांची नेमणूक करीत आहेत. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो संपादक देखील स्वताचे पेपर वाचत नाहीत.असे विधान केल्याने उपस्थित पत्रकारांनी त्या वक्तव्याचे जाहीर निषेध केला.हे विशेषदरम्यान खा.प्रताप पाटील चिखलीकर हे कोरोना काळ वगळता मागील तीन वर्षांपासून दर्पणदिनाचे औचित्य साधून जिल्हाभरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता
या सोहळ्यात तुम्हारे खत में हामारा सलाम या म्हणीप्रमाणे आ.पवारांनी आपले मनोगत व्यक्त करतांना काही वर्तमानपत्राचे नावे घेऊन ही वर्तमानपत्र माझ्या बातम्या छापत नाहीत.वर्तमान पत्राचे मालक आपल्या प्रतिनिधीस वेठीस धरतात यास अनेक वाचाळ बडबड आपल्या भाषणात केल्याने सभागृहात व व्यासपीठावर असलेल्या उपस्थित
पत्रकारांनी आमदारांना आपल्या अवकातीत बोला वर्तमानपत्राच्या कामकाजात नाक खुपसू नका असे खडे बोल सुनवल्याने स्थाभित झालेल्या पवारांना आपली जागा घेतली.सभागृहात उपस्थित जिल्हाभरातील पत्रकारांनी आ.पवारांच्या बेताल वक्तव्या बदल घुसबूस सुरू झाल्याने पवार यांनी अवघ्या दहा पंधरा मिनिटांनी सभागृहातून काढता पाय घेतला जिल्हाभरातील पत्रकार मध्ये चर्चेला उधाण आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोपत खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी आवर्जून म्हणाले एक दैनिक माझ्यासाठीचं दैनंदिन बातम्या प्रकाशित करतात. मात्र मी खेळीमेळीचे वातावरणात आलेल्या बातम्यांचे स्वागत करतो मात्र टीकाटिप्पणी करीत नाही.

0 Comments