Header Ads Widget

"स्वच्छ पाणी वृक्षारोपण शिक्षण ग्राम स्वच्छता व वयोवृद्धांना आधार” हीच ग्रामविकासाची पंचसूत्रीकृषी महोत्सवात भास्कर पेरे यांचे मार्गदर्शन !!

बिलोली : गंगाधर कुडके :- 

गावातील व्यक्तींचे आरोग्य जपण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाची कामे होणे गरजेचे आहे. त्यात गावातील प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन जबाबदारी उचलावी. भौतिक सुविधेसोबतच गावात स्वच्छ पाणी, वृक्षारोपण, शिक्षण, ग्राम स्वच्छता व वयोवृद्धांना आधार आदी कामे नियमित चालू रहावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
गावाचा दर्जा तपासण्यासाठी आणि तो उंचावण्यासाठी विविध स्पर्धेत गावाने सहभाग घ्यावा”, असे सल्ला आदर्श ग्राम प्रतिनिधी भास्कर पेरे  यांनी उपस्थित विद्यार्थी, शेतकरी व परिसरातील ग्रामपंचायत प्रतिनिधींना दिला
सगरोळी बिलोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी तंत्रांज्ञान महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी ते बोलत होते पाटोदा जि. औरंगाबाद येथे सलग २५ वर्षे सरपंच असलेले श्री. भास्कर पेरे यांनी आपल्या गावात ज्या विविध विकासाच्या योजना कार्यान्वित केल्याने शासनाकडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत 
त्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती देऊन गावाने ग्रामपंचायत स्वयंपूर्ण करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले. शासनाचे अनुदान तर मिळतेच पण याचा लाभ गावाला होईल अशी खात्री नसल्याने नागरिक कायम समाधानी असतात असे ते म्हणाले आहे
पण गावाचा विकास लोकांनीच पुढे येऊन करावा असे ते बोलले. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान केले आहे 

संस्कृति संवर्धन मंडळाचे  चेअरमन प्रमोद देशमुख यांनी,  यशदाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सदस्य व सरपंच प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.  जे चांगलं आहे ते आवर्जून पहावं, चांगला विचार ठेवावा व लोकांच्या भल्यासाठी कार्यरत राहावं असे आपल्या प्रास्ताविकेत केले असून कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांच्या उपस्थितीत केले 
भारत सरकारने भारतातील कृषी विज्ञान केंद्रावर मोठी जबाबदारी दिली आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्रासोबत कार्य करेल, भविष्यात सगरोळी येथील केंद्र हे सर्वात उच्च दर्जाचे असेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी व्यक्ती केली. थरमॅक्स ऑनसाईट एनर्जी सोल्युशन कंपनीचे राम चव्हाण यांनी, बायोमास व पिकांच्या काढणीनंतर शिल्लक काढापासून चांगले

 उत्पन्न मिळू शकते ह्याचे सविस्तर गणित शेतकऱ्यांसमोर मांडले. यावेळी नाविन्यपूर्ण शेती करून उत्पादन घेणाऱ्या  बळीराजाचा सन्मान करण्यात आल्या. या तीन दिवसीय महोत्सवास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या संस्था, शासकीय कार्यालये, उद्योगसमूह, मिडिया, शेतकरी इत्यादींचे कृषी विज्ञान केंद्राने  आभार मानले.

Post a Comment

0 Comments