शहरातून होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम शहरातील परमेश्वर मंदिर कमान पासून ते रेल्वे गेट पर्यंत अपूर्ण राहिले आहे, त्याचबरोबर सदरील रस्ता हा पूर्णपणे खोदकाम न करता डांबरीकरणाचे काम खोदून सदरील रस्त्यावर डस्ट विसित टाकून रस्ता तयार करण्यात आला परंतु सदरील रस्त्यावरील डस्ट गिट्टी उघडी पडली आहेयामुळे या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या डस्टच्या धुळीमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यासह रोजच्या रोज तालुक्याच्या ठिकाणी येत असताना धुळीचा सामना करावा लागत आहे
धुळीची एलर्जी ही अनेकांना होत असते. ज्यामुळे त्यांना शिंका येणे, श्वास घेण्यात अडचण, वाहणारे नाक, भरलेले नाक, डोळे सुजणे, डोळे-नाक आणि घशात खाज येणे, खोकला, डोकेदुखी, थकवा आणि अशक्तपणा यासह इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. धुळीच्या कणांमध्ये सूक्ष्मजीव असतात.संबंधित ठेकेदारांनी वेळेत काम न पूर्ण केल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याच्या पवित्र्यात शहर वासी यासह ग्रामीण भागातील नागरिक असल्याची चर्चा होत आहे अनेक वाहनधारक हे गिट्टीवरून मोटरसायकल घसरून पडत आहेत. सदरील रस्त्यावरून येजा करणाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे
ठेकेदार तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची खेळत असल्याचे चर्चा ही शहरवासीयातून होत असल्यामुळे तालुक्यातील नागरिक आक्रमक होऊन दिनांक 1 मार्च 2023 रोजी रस्त्याचे काम चालू करेपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

0 Comments