Header Ads Widget

कुंटूर पोलिसांने कोकलेगाव शिवारात जुगार आडा केला उधवस्त - सपोनि महादेव पुरी -

     माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कोकलेगाव व चारवाडी रस्त्यावर काही जुगारी जुगार खेळत असल्याची माहिती कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांना मिळताच एक पथक तयार करून सदरचा जुगार अड्डा उधवस्त केल्याची माहिती कुंटूर पोलीसानी दिली आहे
तालुक्यातील कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारच्या जुगार आड्यावर छापा मारला यात आठ पैकी तीन जुगारी पोलीसाच्या ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून त्यांच्या कडून ११ हाजार रुपये व  तीन मोटार सायकल असा एकूण दोन लाख ६ हाजार रुपयाचा माल हस्त गत करण्यात आल्याची माहिती सपोनि पुरी यांनी दिली आहे

कुंटूर पोलीसानी कोकलेगाव ते चारवाडी रस्त्या जवळ असलेल्या मगदूम असीद शेख,रफिक रसूल चौधरी,शिवाजी सिंगणे,गंगा इळतगाव, प्रभाकर शेळगाव,पांडुरंग कदम,व्यंकट धनजगावे, अतीक शेख, यांनी तिर्रट नावाचा जुगार खेळतांना सपोनि महादेव पुरी यांनी छापा मारला तर पॉका विवेक ईश्वरे यांच्या फिर्यादी वरुन कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व पुढी तपास कुंटूर पोलीस करीत आहे

Post a Comment

0 Comments