महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी मोठ मोठाल्या योजना दिल्या आहेत परंतु अनेक वर्षा पासून ग्रामीण भागात पाणी पुरवठा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक गावात सदरच्या योजनेचे पाणी तर सोडाच परंतु अर्धवट कामे अनेक गावात शिल्लक असल्यामुळे कधी पूर्ण करणार असा प्रश्न भेडसावत आहे
ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यांनी अर्धवट कामाचे सुद्धा पूर्ण बिले दिल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
प्रशासन दरवर्षी ग्रामीण भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून विविध योजनांच्या माध्यमातून मोठा निधी देतो परंतु सदरील अधिकाऱ्यांच्या व गुत्तेदारांच्या संगनमताने कामे केले जाते केलेल्या कामाच्या योजनेची नळ योजना व पाणी मिळत असलेले दाखवा म्हणून नागरिकांतुन संताप व्यक्त केला जात आहे
बिले सुद्धा काढले जातात परंतु काम अर्धवट ठेवून सदरचे बिले कसं काय अधिकारी देतात हा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे या संदर्भात गुत्तेदारा ऐवजी अधिकाऱ्यांचीच चौकशी करण्याची गरज असल्याचे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे
ग्रामीण भागात गेल्या दहा ते पंधरा वर्षाखाली मंजूर करण्यात आलेले व बांधकाम करण्यात आलेल्या पाणी पुरवठा विहिरीचे व टाकीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहेत
ग्रामीण पाणी पुरवठा नायगाव विभागाचे अधिकारी मूग गिळून का ? बसले आहेत रेंगाळलेले काम पूर्ण करण्यासाठी गुत्तेदाराला का तंबी का लावत नाहीत असा ही प्रश्न चर्चेला जात आहे
सदरच्या अधिकाऱ्यांनी रेंगळलेल्या कामाची चौकशी अद्याप केली नसल्यामुळे आता त्यांची चौकशी करण्याची गरज असल्याचे ही सदरच्या जनतेतून व नागरिकांतून बोलल्या जात आहे

0 Comments