माधव पवार
उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली या कार्यालयात आयपीएस आर्चीत चांडक यांनी गेल्या वर्षी पदभार स्वीकारला होता एक पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असताना अवैध धंद्या बरोबर इतर बाबीवर त्याने कटाक्ष लक्ष ठेवले होते त्याची बदली नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली असल्याचे सांगण्यात येते
आयपीएस चांडक यांची बदली नागपूर येथे झाल्याची चर्चा होत असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्या लोकांना मात्र आता रान मोकळे झाले असल्याची ही चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
नागपूर येथे अर्चित चांडक यांची बदली झाली असली तरी नायगाव कुंटूर रामतीर्थ बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अगोदर पासूनच चांगले काम करीत आहेत आणि पुढे ही काम करतात अवैध धंद्यांना थारा देत नाहीत असे ही त्याने सांगितले असून आयपीएस अर्चित चांडक यांच्या कार्यकाळात सुद्धा सदरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध धंदे करण्यावर मोठ मोठ्या धाडी मारल्या आहेत
एक आयपीएस अधिकारी असताना सुद्धा जनसामान्य माणसांच्या संपर्कात होते अर्चित चांडक यांची बदली झाल्याची चर्चा अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळत असली तरी सदरील बदलीची खात्री करून घेण्यासाठी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून चांडक यांना संपर्क केला असता त्याने असे सांगितले की एस हमारा ट्रान्सफर हो गया है अच्छा काम करते रहो असे आयपीएस अर्चित चांडक यांनी बोलताना सांगितले आहे

0 Comments