नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन कारांच्या कीर्तनाने श्री क्षेत्र खंडोबा मंदिर येथे अखंड हरीनाम सप्ताह व महाप्रसादाचे आयोजन समस्त घुंगराळा वासीयांच्या वतीने केले आहे
सदरील कीर्तनाचा लाभ घुंगराळा परिसरासह पंचकृशीतील भाविक भक्तांनी या वैचारिक मेजवानीस उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांनी केले आहे गावकऱ्याच्या वतीने दिनांक ५ रोजी सप्ताहाच्या निमित्ताने भव्य मिरवणूक व शोभा यात्रा सकाळी ११ वाजून ३० मिनिटानी गावातील मुख्य रस्त्यानी गावकऱ्याच्या वतीने काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे मौजे घुंगराळा येथे दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री हं भ प भागतचार्य मधुसूदन महाराज कापसीकर दिनांक ६ रोजी श्री हं भ प रामायणाचार्य बालाजी महाराज गुडगेवार नांदेड दिनांक ७ रोजी श्री हं भ प कृष्णा महाराज राजुरकर दिनांक ८ रोजी श्री हं भ प भागवताचार्य रुपालीताई सवणेकर दिनांक ९ रोजी श्री हं भ प चंद्रकांत महाराज लाठकर दिनांक १० रोजी कीर्तन होणार आहे घुंगराळा येथे श्री हं भ प भागवताचार्य साध्वी महंत मुक्ताई नाथ माऊली उदगीर दिनांक ११ रोजी श्री हं भ प. बाबू महाराज काकांडीकर दिनांक १२ रोजी श्री हं भ प. विशाल महाराज खोल्हे जळगावकर व दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री हं भ प. विशाल महाराज खोल्हे बुलढाणकर यांचे सकाळी ९ ते ११ पर्यंत होणार आहेश्री क्षेत्र खंडोबा म्हाळसांकात अखंड हरीनाम साप्ताह दरवर्षी प्रमाणे या वर्षी दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोज रविवार या कालावधीत अखंड हरीनाम साप्ताहचे गावकऱ्यानी आयोजन केले असल्यामुळे पाहाटे ४ ते ६ काकडा आरती स.८ ते ९ मल्हारी शप्तशदी पाठ व वाचन स.१० ते ११ पारायण दुपारी १ ते २ गाथा व अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
भजन संध्याकाळी ५ ते साडे सहा हरीपाठ रात्री साडे आठ ते ११ कीर्तन व दररोज खंडोबा देवाचा जागरणाचा आणि वाघ्याचा कार्यक्रम नरसी घुंगराळा कुंटूर बरबडा अंचोली सोमठाणा शंकर नगर धूप्पा यांचा राहणार असल्यामुळे सदर कार्यक्रमाला भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

0 Comments