नायगाव तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून व अध्यक्ष म्हणून काम करीत असताना एक जबाबदारी माझ्याकडे टाकली असल्यामुळे ग्रामसेवकाच्या प्रशासकीय विविध मागण्याच्या संदर्भात शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष टी जी रातोळीकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
तालुक्यातील एकूण ८९ गावे आहेत या पैकी बऱ्याच गावांत ग्रामसेवका दोन ते तीन गावे असल्यामुळे सदरील गावांत कामे करीत असताना मोठया प्रमाणात ग्रामसेवकावर ताण तणाव येत असते परंतु आमचा ग्रामसेवक चांगल्या प्रकारे काम करत आहेत
परंतु जे काही शासकीय आडी अडचणी संघटने समोर प्रश्न उद्भवतात त्यावेळी मी संघटनेचा अध्यक्ष म्हणून प्रामाणिक पणे कामे करावी लागतात यात काही शंका नसल्याचे टी जी रातोळीकर यांनी सांगितलेयापुढे ही जाऊन ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी जी रातोळीकर यांनी सांगितले की नायगाव तालुक्यात संघटनेचे काम करीत असताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते वेळोवेळी ग्रामसेवकाच्या बैठका घेणे कर्मचाऱ्यांच्या आडीअडचणी नीट समजावून घेणे आवश्यक असते असे ही त्यांनी सांगितले आहे
व त्या बाबीवर मात करण्यासाठी अध्यक्ष म्हणून एक मोठी जबाबदारी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष टी जी रातोळीकर यांनी सांगितले असून ग्रामसेवकांच्या विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहेत

0 Comments