माधव पवार : नेटवर्क थेट तुर्की :-
हजारो टन वजनाच्या ढिगाऱ्याखालून लोक सुखरूप बचावल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत तुर्कीतील हाताय येथे दिनांक ११ रोज शनिवारी ढिगाऱ्याखालून दोन महिन्यांच्या बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे
मृत्यूला हरवत या चिमुकल्यासाठी जमावानं टाळ्या वाजवल्या वाजवील्या आहेत चिमुकल्याला वाचवल्याचा आनंद मदत आणि बचाव पथकाच्या चेहऱ्यावर दिसत होता भूकंपा नंतर सुमारे १२८ तासांनी हे बाळ सुखरुप सापडलं आहेतुर्की आणि सीरिया मधील विनाशकारी भूकंपां मध्ये सुमारे २९ हजारा पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रगती पथावर प्रयत्न चालू आहे
यामध्ये अनेक नागरिक बचावल्याच्या घटना समोर येत आहेत आता बचाव पथकाने सुमारे १२८ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिन्यांच्या बाळाला सुखरुप बाहेर काढले असून या चिमुकल्यानं मृत्यूला ही पळवून लावल आहेतुर्की आणि सीरिया मध्ये दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठा भूकंप झाला होता त्या नंतर अनेक भूकंपाचे धक्के बसले आहेत भूकंपामुळे हजारो घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळल्या असल्याचे दिसून आले आहे
ढिगाऱ्याखाली अडकून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. अद्याप ही ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकले आहेत. प्रशासना कडून युद्ध पातळीवर मदत कार्य आणि बचावकार्य सुरु आहे. भूकंपामध्ये ८५ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत

0 Comments