Header Ads Widget

वजीराबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि संजय निलपत्रेवार माळाकोळी पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारला !!

     माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा वजीराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सपोनि संजय डी निलपत्रेवार यांनी रेकॉर्ड वरल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत

अशा वजीराबाद पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची बदली माळाकोळी पोलीस ठाण्यात झाली असल्यामुळे सपोनि संजय डी निलपत्रेवार यांनी ठाण्याचा पदभार स्विकारला आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याच्या नंतर काही दिवसातच त्यांची बदली नांदेडच्या पोलीस मुख्यालयात करण्यात आली होती

त्या नंतर या दमदार पोलीस अधिकाऱ्यांची बदली वजीराबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळत रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगाराला जेरबंद करण्यासाठी सपोनि निलपत्रेवार आपल्या पोलीस कर्तव्यातून दाखवून दिले असल्यामुळे त्यांचे वेळोवेळी कौतुक ही करण्यात आले होते वजीराबाद पोलीस ठाण्यातून कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांची माळाकोळी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून तत्कालीन सपोनि कंटूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना आपले कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडले आहे   

सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांचे नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी त्यांच्या कामगिरी बद्दल म्हणजेच रेकॉर्डर असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी नांदेड मध्ये जंग पछाडल्यामुळे त्यांचे कौतुक ही करण्यात आले होते

अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची बदली माळाकोळी पोलीस ठाण्यात झाली असल्यामुळे असा दमदार पोलीस अधिकारी ग्रामीण भागात पोलीस स्टेशनला असणे आवश्यक असल्याचे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments