Header Ads Widget

शाळा म्हणजे सोन्याचा पिंजरा असतो सहशिक्षिका शोभाताई चंबलवार यांचे मत !!

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथे शाळेचे मुख्याध्यापक बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा निमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना यावेळी निरोप देण्यात आला आहे

व मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात बोलताना शाळेच्या सहशिक्षिका सौ शोभाताई चंबलवार म्हणाल्या की शाळा म्हणजे सोन्याचा पिंजरा असल्याचे मत व्यक्त केल्या आहेत
तालुक्यातील घुंगराळा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये  विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला काही दिवसात इयत्ता दहावीच्या परीक्षा जवळ येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता न चुकता अचूक प्रश्न उत्तर सोडावे असे आवाहन करण्यात आले

व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक बोडके यांच्यासह श्याम पाटील ढगे व ज्येष्ठ व सहशिक्षक पावडे, विलास बोरगाव, इंगळे , राम अलमवाड सोमवाड, शेख रफिक यांच्यासह घुंगराळा येथील खंडू पाटील ढगे उपस्थित होते
शाळेच्या सहशिक्षिका शोभाताई शंकरराव चंबलवार यांनी आयोजित केलेल्या कार्क्रमात बोलताना म्हणाल्या की शाळा ही सोन्याचा पिंजरा असतो त्या पिंजऱ्यात राहून आपणाला शिक्षण घ्यावे लागते आणि अभ्यास ही करावे लागते म्हणून शाळा ही सोन्याच पिंजरा असल्याचे ही यावेळी व्यक्त केल्या आहेत

ही यावेळी सौ चंबलवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले सदर कार्यक्रम हा दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 
जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा ही नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि दहावीच्या परीक्षा अगदी जवळ आल्यामुळे सदरच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक वर्गाच्या माध्यमातून व विद्यार्थ्यां कडून निरोप देण्यात आला आहे
शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत परीक्षा देत असताना प्रश्न कोणते ही असू असो ते नीट समजावून घेऊन त्यांचे उत्तर अचूक पद्धतीने दिल्यास विध्यार्थी १०० टक्के उत्तीर्ण होऊ शकतो असे ही जिल्हा परिषद हायस्कूलच्या सहशिक्षिका शोभाताई चंबलवार यावेळी म्हणाल्या आहेत

शाळा म्हणजे सोन्याचा पिंजरा असतो सहशिक्षिका शोभाताई चंबलवार यांनी घुंगराळा हायस्कुल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केल्या आहेत 













Post a Comment

0 Comments