तालुक्यातील मुख्य असलेल्या येथील टपाल कार्यालयास स्वतःची इमारत नसल्याने गेल्या अनेक दशकापासून हे कार्यालय एका ठिकाणाहून दुसरे ठिकाणी असा प्रवास करीत भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहे
जागेची कमतरता व इतर कारणामुळे ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेता इमारतीसाठी स्वतःची जागा असावी म्हणून काहींनी दान स्वरूपात टपाल खात्यास जागा उपलब्ध करून दिली होती
परंतु काही ना काही कारणाने या इमारतीचे बांधकाम होत नव्हते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न लावून धरल्याने अखेर यश आले
नायगावचे टपाल कार्यालय तसे फार जुनेच. जुन्या गावांमध्ये मेडेवार यांच्या इमारतीमध्ये भाड्याने हे कार्यालय सुरू झाले आहे
या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तालुक्यातील नरसी, धानोरा, घुंगराळा, कहाळा, कोकलेगाव, कुंटूर, कुष्णूर, देगाव, मनुर, पाटोदा, सांगवी, सुजलेगाव, रुई,वाकाआदी ठिकाणचे शाखा कार्यालय येतात.जुन्या गावात हे कार्यालय असताना गावच्या विकासासंदर्भात विविध मागण्यांसाठी जेव्हा-केव्हा आंदोलने होत होतीत्यावेळेस कार्यकर्ते आपला राग याच कार्यालयावर काढून नास धूस करणे असे प्रकार घडत गेल्याने वरिष्ठांनी हे कार्यालय या ठिकाणी नको म्हणून काही महिने बंद ठेवून बाहेर गावी त्याचे स्थलांतर करीत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हे टपाल कार्यालय येथे असणे किती गरजेचे आहे
याची जाणीव संबंधितांना करून देते ते पुन्हा येथे चालू करण्यास भाग पाडले. जुन्या गावातील इमारतीमधून त्याचे ग्रा.पं.च्या इमारतीमध्ये स्थलांतरित करून ते पूर्ववत सुरू झाले आहे
हे करत असताना तत्कालीन पोस्टमास्टर ऑफ जनरल पी एम जी बबन मोडक यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास आपण इमारतीचे बांधकाम करून असा शब्द दिल्याने त्यांच्या शब्दाचा मान राखत माजी आ. वसंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेत ग्रा.पं.च्या मालकी हक्काची लाखो रुपयाची जागा दान स्वरूपात इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिली आहे
मोडक यांची बदली झाल्याने हा प्रश्न रेंगाळला होता आणि पत्रकार वहाबोदीन शेख यांचा ही सिंहाचा वाटा आहे !

0 Comments