नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने बस स्टॅन्ड जवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज तथा माँ जिजाऊ साहेबांचे पुत्र शिव छत्रपती शिवाजी राजे यांचा शिवजन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी येथील विशेष मान्यवरांच्या उपस्थित सदरचा कार्यक्रम संपन्न झाला आहे
बरबडा येथे गावकऱ्यासह कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सदरचा शिवजन्मउत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला समस्त गावकऱ्यांनी एकत्रितपणे येऊन सदरचा शिवजन्मोत्सव मोठया आनंदाने साजरा केला आहे
तालुक्यातील बरबडा येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने बस स्टँड जवळ भव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाला बरबडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच माधव कोलगाणे यांच्यासह उपसरपंच प्रतिनिधी दिलीपराव धर्माधिकारी माजी सरपंच बालाजी मदेवाड भास्करराव धर्माधिकारी विश्वनाथ बडुरे व्यंकटी पाटील गिरे शंकर पाटील पवार बाबू पाटील शेवाळे पप्पू पाटील शिंदे चक्रधर पैलवान आदी यावेळी उपस्थित होते
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बरबडा येथे साजरी करण्यात आली या विशेष कार्यक्रमाला मुख्याध्यापक
गुंटे विभुते शिंदे पठाण सतीश सिंगेवाड संदीप पाटील थेटे
अवधूत पाटील गिरे भगवानराव शेवाळे भास्करराव पाटील शिंदे लक्ष्मण पाटील मोदड आदी यावेळी जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते हा जयंती सोहळा शिवरायांचा असल्यामुळे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला शिवप्रेमी बांधव आवर्जून कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती

0 Comments