राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांच्या वतीने नायगांव येथे संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त कामगार मेळावा घेण्यात आला
नायगांव शहरातील संत रोहिदास नगरमध्ये दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६४६ वी उत्साहात साजरी करण्यात आली आहे
या कार्यक्रमानिमित्त कामगार मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नायगांव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.मिनाताई सुरेश कल्याण तर प्रमुख उपस्थितीत भाऊ पाटील चव्हाण, रोहिदास पाटील बोमनाळे श्रीकांत पाटील कल्याण, पांडुरंग बुध्देवाड , गजानन पाटील चव्हाण, महेश कदम,यांची उपस्थिती होती
कार्यक्रम स्थळी शिवाजी कांबळे,, वाघमारे राजु नागेश भालके बालकेडे संदीप, राजू सोनटक्के, संतोष सूर्यवंशी, संतोष भालके,,संजय सोनटक्के, सुनील हवेलीकर, अनिल हवेलीकर, माधव सोनटक्के, ज्ञानेश्वर सोनटक्के, मोहन गंधारे, महिला ची उपस्थित कुसुमताई कांबळे,अंजनताई दुधबे शोभाताई कांबळे,जमनाबाई सोनटक्के विमलबाई बालकेडे, आमिना शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गुरू शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुजन व पुष्पहार अर्पण करून झाली यानंतर उपस्थितीत कामगांराना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला रोहिदास नगर परिसरातील व तालुक्यातील चर्मकार समाज बांधव व महिला भगिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments