माधव पवार
नांदेड जिल्हाच्या अर्धापूर तालुक्यातील प्रसाद ब्रिस्टल पोल कारखान्या समोर विचित्र अपघात दोन जण ठार तर सहा ते सात जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत सदरचा अपघात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने अगोदर आयचर टेम्पोवर धडकली आहे
सदरची कार दुसऱ्या एका कारला धडक दिल्याने टेम्पो चालकासह दोन जण जागीच ठार झाले असल्याचे सांगण्यात येते तर तर सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत
सदरील घडलेल्या विचित्र अपघातात आयचर क्रमांक एमएच १३- सीयु ४२४४ वरील चालक रामा प्रल्हाद डोंगरे राहणार इंचेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तसेच अमित विठ्ठल घुगे राहणार गितानगर नांदेड हे दोघेजण जागीच ठार झाले असल्याची माहिती मिळते आहे अर्धापूर तालुक्यातील प्रसाद ब्रिस्टल पोल कारखान्या समोर झालेल्या विचित्र अपघात जखमीना नांदेडच्या शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार चालू असल्याची माहिती येते सदरचा अपघात पहाटेच्या दरम्यान झाला असल्याची माहिती असली तरी महामार्ग पोलिसांनी तात्काळ रुग्णाला नांदेड येथे पाठवले आहे
सदरची कार क्रमांक एमएच ३७- जी ९८८९ ही कार नांदेडकडे भरधाव वेगात असताना अर्धापूर ते नांदेड रस्त्यावर असलेल्या प्रसाद ब्रिस्टल पोल कारखान्या समोर सर्वात अगोदर डिव्हायडरवर धडकली असल्याचे सांगण्यात येते त्यानंतर ही कार समोर असलेल्या आयचरला धडक उडवली नंतर या कारने पुन्हा दुसऱ्या कार क्रमांक एम एच २३ ए डी ३५६७ या कारला सुद्धा जब्बर धडक दिली आहे
या अपघातात साईनाथ मुळे सर्व नाईकनगर नांदेड तसेच नजमा बेगम, सय्यद अहमद नावीद बेगम जैनब सय्यद सय्यद आयान स्वप्निल पाटील अभिजीत शिरफुले हे राहणार
बरकतपुरा माळ टेकडी नांदेड हे जखमी झाले असल्याची माहिती मिळते महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण यांनी आपल्या पथकासह रात्री घटनास्थळी धाव घेतली आहे
अपघात अडकलेल्या वाहनातून जखमींना बाहेर काढुन त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

0 Comments