Header Ads Widget

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या मागणीला लवकर यश मिळणार !!

      माधव पवार
केंद्रात भाजपाची तर राज्यात देवेंद्र आणि शिंदे गटाची सत्ता अस्तित्वात असल्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नामदार नितीन गडकरी यांच्या कडे विविध विकास कामाच्या संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली आहे

नामदार नितीन गडकरी यांच्या कडे केलेल्या मागण्याचे लवकरच कामे मार्गी लागतील असा विश्वास माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी व्यक्त केला आहे

नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नांदेड येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नुकतीच मागणी करण्यात आली आहे

जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील व माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर या विकास अभिमुख नेत्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे नायगाव तालुक्यातील व उमरी तालुक्याच्या सिमेवर असलेले गोदापात्रात भायेगाव या ठिकाणी पूल तात्काळ मंजूर करण्यात यावे म्हणून मागणी केली त्याच बरोबर अनेक विकासाच्या संदर्भात ही मागण्या करण्यात आल्या असल्यामुळे  मागणी लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे 

Post a Comment

0 Comments