माधव पवार
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या दरबारात शिवसेना पक्षाची मूळ शिवसेना कोणाची निशाणी कोणाची हे ठरविण्यातच निवडणूक आयोग व्यस्त असल्याने राज्यातल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रेंगाळल्या असल्याने राज्यातल्या पंचायत समितीच्या सभापती विना सभागृह व कार्यालय आजारी पडले असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
राज्यातले राजकारण अतिशय गेल्या वर्षापासून ढवळून निघाले असल्यामुळे अख्ख्या राज्यातल्या जनतेचे लक्ष महाराष्ट्र
राज्य निवडणूक आयोगासह उच्च न्यायालयाकडे लागले असल्याचे दिसून येत आहे
राज्यातल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विद्यमान सभागृहांची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्येच संपली तरी एक वर्ष पूर्ण झाले असताना सुद्धा निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर केल्या नाहीत असे तमाम जनतेतून बोलल्या जात आहे
ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या पंचायत समिती ह्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका गेल्या एका वर्षापासून रेंगाळल्या असल्यामुळे सदरच्या निवडणुका कधी लागतील असा ही प्रश्न राजकीय पुढाऱ्यासह तमाम जनतेतून केला जात आहे

0 Comments