मैत्रिणीच्या लगनात मुली रडती का धाय धाय...
हिचं तर लगीन झालंय आता माझं कधी होणार हाय...या विनोदी कवितेला शालेय विद्यार्थ्यांनी खळखळून हसत अक्षरशः डोक्यावर घेतले आहे
नववधूच्या मनातील सुलभ भावना या कवितेतून विनोदी रूपाने बालाजी पेटेकर यांनी व्यक्त करून सर्वांना खूप हसवले.या नंतर मोबाईल न बोलणा-या माणसाला मुकं करत इंटरनेटच्या मोहजाळ्यात अडकून अमुल्य वेळ आजची तरुण पिढी कशी वाया घालवत आहे यावर त्यांनी भयावह भाष्य उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
मोबाईलच्या अती वापरामुळे माणूस सवयीचा गुलाम झाला.असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक बालाजी पेटेकर यांनी केले.ते सुजलेगाव येथील मोहनराव देशमुख हायस्कूलच्या सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समयी बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा नेते रुपेश भैय्या देशमुख कुंटूरकर हे होते
तर प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून ग्रामीण कवी बालाजी पेटेकर हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जय किसान विद्यालय कोल्हे बोरगाव चे मुख्याध्यापक हावगीराव गोपछडे सर,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक मनोज गादेवार सर हे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज व स्व.गंगाधररावजी देशमुख कुंटूरकर यांच्या प्रतिमेचे पूजनाने दिप प्रज्वलन करून विद्यार्थ्यीनींच्या सुमधुर स्वागत गीतांनी व लेझीम नृत्यानी,दांडिया नृत्याविष्कारांनी झाले मुख्याध्यापक,नकाते सर यांनी कल्पकतेनी शाळेचा यशस्वी लेखाजोखा आपल्या प्रस्तावनेतुन उपस्थित मान्यवरां समोर मांडला आहे
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झालेल्या विविध कार्यक्रमांतील व खेळातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मुख्याध्यापक गोपछडे सर यांनी आपल्या मनोगतातून यशस्वी होण्याचा मंत्र देत हितगुज साधले.
प्रख्यात साहित्यिक तथा कवी कथाकार बालाजी पेटेकर यांनी या टीव्ही मोबाईल मुळे,हीच तर लगीन झालंय आता माझं कधी होणार हाय... शेतकरी राजा या कवितेतून आणि काजळ मया ह्या कथेने सर्वांना खळखळून हसवण्याबरोबरच अंतर्मुख करायला लावले.
त्यानंतर युवा नेते रुपेश देशमुख कुंटूरकर यांनी शाळेच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेतील गिरी सर यांनी केले तर आभार कानगुलवार सर यांनी मानले.या कार्यक्रमास,गोपछडे सर,होकर्णे सर प्रा.पवार सर,मुरमुरे सर,चिंचोले सर,काळेशार सर,सौ.नव्हारे मॅडम,शोभा वडजे मॅडम हे उपस्थित होते.या कार्यक्रमास पालक व विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती.


0 Comments