Header Ads Widget

सावरखेडच्या जिल्हा परिषद शाळेत गट शिक्षणाधिकाऱ्याच्या उपस्थितीत गुणवंत विध्यार्थीचा सत्कार 🌹

  
      माधव पवार
नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरखेड येथे दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी नायगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नंदकुमार काकणे यांच्यासह शाळेतील शिक्षकाच्या गावकऱ्याच्या उपस्थितीत गुणवंत विध्यार्थीचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे तालुक्यातील सावरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक भाऊराव कानोले यांच्यासह शिक्षकानी शिक्षणाच्या बाबतीत अतिशय सुंदर कामगिरी करत असल्यामुळे सावरखेडच्या शाळेतील विध्यार्थी घडत आहेत व विविध स्पर्धेत सहभाग घेऊन विध्यार्थी उत्तेजन बनत आहेत एन एम एस एम परीक्षेत जि.प.प्रा.शा. सावरखेड शाळेचे घवघवीत यश शाळेतील एकूण ९ पैकी ६ विद्यार्थी  परीक्षा उत्तीर्ण झाले असल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकाचे गावकऱ्याच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे शाळेतील विध्यार्थी वानखेडे रामेश्वर राजू ९२.७३आपतवाड प्रविण विनायक ८९.६१ शिंदे संस्कृती शंकर ८२.३९ शिंदे पुनम बालाजी ७७.२२ बत्तीनवाड श्रीकृष्ण आनंदा ७३.९ हानमंते प्रमिता यशवंत ६५.८७ सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव कानोले यांच्यासह शाळेतील शिक्षकानी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे 

मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष सावरखेड ग्रामपंचायत,पालक व जेष्ठ नागरिक विद्यार्थी व शिक्षक वृंद जि.प.प्रा.शा. सावरखेड केंद्र कृष्णूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड मुख्याध्यापक शाळेचे भाऊसाहेब कानोले, संजय ठक्करवाड, रमेश राजूरे,सौ.अरूणा शिरामणे मॅडम, सतीश जानकर, इत्यादी मार्गदर्शन केले आहे

Post a Comment

0 Comments