Header Ads Widget

बरबडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अमृतमहोत्सव निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम



बरबडा :- किरण हणमंते 

बरबडा येथील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळा बरबडा यांच्यावतीने अमृत महोत्सव  दिनाचे औचित्य साधून दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी रात्री ८ वाजता कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तत्पूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले

 हा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध कलागुणांचा वाव मिळवा तसेच त्यांना स्टेज धैर्य येण्या साठीचा या साठी घेण्यात येत असल्याची सांगण्यात येत आहे

कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगाव पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी श्री. नंदकुमार काकडे या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षणविस्तार अधिकारी फटाले, केंद्रप्रमुख माधव रेडेवाड, बरबडा नगरीचे सरपंच माधव केरबाजी कोलगाणे, माजी सरपंच बालाजी मोहनराव मदेवाड, पत्रकार किरण हनमंते, पत्रकार देविदास जेटेवाड, पत्रकार चंद्रकांत सुर्यतळ, पाटोदा शाळेचे मुख्याध्यापक माधव शिंगेवाड आदी उपस्थित होते 

ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रल्हाद जेटेवाड, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अफसर पटेल शेख, उपाध्यक्ष साईनाथ पवार, तसेच कन्या शाळेचे बरबडा मधील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद आनेमवाड , उपाध्यक्ष दत्ता जेटेवाड  आणि सर्व सदस्य यांची  उपस्थिती होती.
गणेश वंदना प्रथम तुला वंदितो, देवा श्री गणेशा, जगात गाजा वाजा भिमराव माजा, माया भिमान सोन्यान भरली ओटी, गवळण अडू नको वाटेवरी, चिऊताई चिऊताई, चंदा ने पूछा तारो से, नमो नमो, आई तुळजाभवानी चा गोंधळ, पांडुरंगाच्या वारीला, खंडोबाच याड लागलं, हाय झूमका वाली पोर, चंद्रा लावणी, प्रीतीच्या झूल्यात झूलवा, देशभक्ती वर देश रंगीला, तेरी मिट्टी मे मिल जावा, मेरा रंग दे बसंती, माँ तुझे सलाम यासहीत अनेक गित सादर करण्यात आले.

त्यामध्ये एकपात्री मि सावित्री बोलते यावर मनोगत व्यक्त केले त्यानंतर दारू बंदीवर छोटी एकांकीका सादर करण्यात आली. या चिमुकल्या चा डान्स बघण्यासाठी गावकरी महिला व पुरुष यांनी एकच गर्दी केली होती. शेवटी सर्व मान्यवर आणि गावकरी शाळेच्या वतीने आभार मांडण्यात आले.

Post a Comment

0 Comments