जाणीव सांस्कृतिक अभियान संस्था या राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय व प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा सामाजिक कृतज्ञता म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो आहे
राज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा पुरस्कार यावर्षी नायगांव विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना जाहीर झाला आहे
जाणीव सांस्कृतिक अभियान, महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर झाला याबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत असून सदरील पुरस्कार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता स्थळ परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर नेहरू गार्डन समोर नाशिक येथे सन्मान करण्यात येणार आहे
डॉ.सुधीरजी तांबे माजी विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य राजन लाखे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे व अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे

0 Comments