Header Ads Widget

नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या कार्य कौशल्यामुळे शिक्षण क्षेत्र तेजदार !!

       माधव पवार
गेल्या दोन ते अडीच वर्षा पासून नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारला असल्यामुळे कोराना महामारीच्या कार्यकाळात अतिशय दमदार कामगिरी करून एक नांदेड जिल्ह्यात वेगळा ठसा उमठविला असल्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर जनतेतून कौतुक ही करण्यात आले आहे
जिल्ह्याच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत असताना सर्व क्षेत्राच्या बाजू तपासून जिल्ह्यात काम करावे लागते तेव्हा सर्व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जास्तीचे अंकुश ठेवणे तेवढे सोपे ही नाही आणि अवघड नाही असे ही जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे

नांदेड जिल्ह्यासाठी एक कर्तव्यदक्ष महिला मुख्यकार्यकारी अधिकारी लाभल्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा शिक्षणाचे माध्यम व शिक्षण क्षेत्र अतिशय दर्जेदार झाले असल्याने विद्यार्थ्यांसह पालकात ही चिंतेविना उत्सुकता वाढली असल्याचे ही विद्यार्थ्यांच्या पालकांसह जनतेतून बोलल्या जात आहेमुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी शिक्षणाकडे  जास्तीचे लक्ष दिले असल्यामुळे शिक्षक वर्ग सुद्धा सक्षम पद्धतीने अभ्यास करून विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण देत देत आहेत

ग्रामीण भागातील हे वास्तव चित्र अनेक शाळेत दिसून येत असून त्याच बरोबर शिक्षणाचा दर्जा ही ग्रामीण भागात तेजदार झाल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे

नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी याने सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांना चांगली तंबी लावली होती त्याच पद्धतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सुद्धा शिक्षकाकडे व शाळेकडे लक्ष दिल्यामुळे शिक्षण क्षेत्र उंच भरारी मारत असल्याचे ही स्पष्ट चित्र दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments