Header Ads Widget

एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात दुसरीकडे राजकीय नेते विधान सभेसह संसदेत भाषण देण्यात व्यस्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव !!

नांदेड / नायगाव : माधव पवार 

भारत देशाला आजच्या घडीला परिवर्तनाची गरज असून देशाला स्वातंत्र्य होऊन गेले ७५ वर्ष पूर्ण झाली असताना या देशात अनेक वेळा सरकार  बदलली त्याच बरोबर नेते बदलत गेले आमदार खासदार बदलले आहेत

परंतु या देशात मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी राजा मात्र बदला नसल्याचे मत तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी नांदेड येथे आयोजित केलेल्या भव्य सभेत ते व्यक्त केले आहेनांदेड येथील आयोजित केलेल्या सभेत बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव म्हणाले की या देशात एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात तर दुसरीकडे राजकीय नेते मंडळी विधान सभेसह संसदेत आपले भाषण देण्यासाठी व्यस्त राहतात आहेत 

शेतकऱ्यांचे सुखदुःखात कोण सहभागी होणार असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी म्हणाले असून सरकार दमदार असेल तरच विकास होईल असे ते सांगत पुढे म्हणाले की देशात पिण्यासाठी पाणी नसल्याचे ही ते म्हणाले आहेदेशात आज घडीला एकूण ४२ टक्के शेतकरी असल्यामुळे यामध्ये शेतमजुराची संख्या जोडल्यास सदरचा आकडा पन्नास टक्क्यापेक्षा वर जातो तसेच सदरचे सरकार बनवण्यासाठी इतकेच संख्याबळ पुष्कळ झाले आहे 

जाती धर्माच्या नावावर लढण्यापेक्षा सर्वानी एकत्र काम व विकास केला तर विकास होईल त्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यानी आयोजित सभेत सांगितले आहे 
यावेळी आयोजित केलेल्या सभेत बोलताना तेलंगणाचे
मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव के सी आर यांनी शेतकरी आत्महत्या आणि पाण्याचे नियोजना बदल राज्यासह केंद्र सरकारवर सडकुन टीका करीत ते आपल्या भाषणात म्हणाले की शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे गोरगरीब गरिबांना वीज सुद्धा मिळत नाही त्यामुळे या बाबीवर विचार करून एकत्रपणे लढा हुभारण्याची आवश्यकता असल्याचे के सी आर यांनी म्हणाले आहे


Post a Comment

0 Comments