नायगाव विशेष प्रतिनिधी :: बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कलचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आ.अशोकराव चव्हाण व माजी.आ.वसंत चव्हाण यांचे खंदे समर्थक हुस्सा येथील रहिवासी विनायक पाटील शिंदे मांजरमकर यांनी आज बी. आर. एस. या पक्षात प्रवेश केला आहे.या मुळे नायगाव तालुक्यात काँग्रेसला खिंडार पडली आहे.तर दोन्ही चव्हाणा ना हा जोर का झटका धिरे से देधका च बसला आहे.
नायगाव तालुक्यात एक वेळा २००७ मध्ये काँग्रेस कडून जि.प.लढवणारे व एक संस्था चालक हुस्सा गावचे माजी सरपंच असणारे विनायक शिंदे हे माजी मुख्य मंत्री अशोकराव चव्हाण यांचे निकटचे म्हणून ओळखले जात होते.नंतर त्यांना तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या पक्ष कार्यात संधी न मिळाल्याने उलट अवमान होऊ लागल्याने पक्ष कार्यापासून दूर दूर राहू लागले होते.
शेतकरी व तरुण वर्गा साठी चांगले काम करणारे तेलंगणा मुख्यमंत्री राव यांच्या कार्यावर प्रेरीतहोऊंन त्यांनी 5 फेबुरवारी सायंकाळी नांदेड येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री राव यांच्या हस्ते नांदेड येथे बीआर एस या पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे.
यामुळे नायगाव तालुक्यात व विविध कार्यक्रमात अग्रेसर राहून काँग्रेस सोबत पक्षणिष्टें ने काम करणारे विनायकराव अचानक बी आर एस मध्ये प्रवेश घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
शेतकरी व तरुणांसाठी काम हा प्रभाव या मुळे पक्ष प्रवेश
विनायक शिंदे !!
गेल्या १५ वर्षा पासून पक्ष कार्यात काम न देता रिकामा ठेऊन काँग्रेस च्या स्थानिक नेतृत्वाने संधी न दिल्याने व आपल्याला शेतकरी वर्गात काम करण्याची आवड असल्याने स्व निर्णयाने आपला प्रवेश केला.असे मत विनायक शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ भ्रमणध्वनी वरून बोलताना व्यक्त केले असे त्यांनी वरपिता एम जे कदम यांनी केले.

0 Comments