Header Ads Widget

ढोल उमरी येथे सेवा सहकारी सोसायटीवर काँग्रेस गटाचे वर्चस्व

नायगाव / उमरी प्रतिनिधी :- 
उमरी तालुक्यातील मौजे ढोलउमरी येथील सेवा सहकारी सोसायटीवर काँग्रेस प्रणित गटाचे बिनविरोध वर्चस्व मिळाले असून चेअरमन पदी गणेशराव पाटील सरसे तर वाईस चेअरमन पदी नारायण मारोतराव माचेवाड यांची बिनवीरुद्ध निवड करण्यात आली यावेळी शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे 

तालुक्यातील ढोल उमरी येथे बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला मौजे ढोलउमरी येथील सेवा सहकारी सोसायटीचे सर्व उमेदवार बिन विरोध काढण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केल्या बद्दल शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांचा  ही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आहे 

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पुयेड ज्ञानेश्वर पाटील सरसे ढोलउमरीचे सरपंच संतोष पाटील सरसे बाबुराव पाटील कोहलेकर यांच्या सह सर्व विजयी उमेदवारांसह अनेक गावातील जेष्ठ मंडळीसह अधिकारी व पदअधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments