Header Ads Widget

टेंभीच्या ग्रामपंचायतने केले अपंगांना साहित्य वाटप आदर्श सरपंच व उपसरपंच ग्रामसेवकाचा आदर्श घ्यावा


हिमायतनगर. :- नागोराव शिंदे :- 

तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगाना साहित्याचे वाटप करण्यात आले असून 
टेंभी येथील ग्राम पंचायत च्या सरपंच पदी निवड झाल्यापासून सरपंच सौ. वंदनाताई कानबाराव पोपलवार ह्या ग्राम पंचायत कार्यालयात नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात अपंगाचा हा महत्त्वपूर्ण विषय अंमलात आणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर कुमार अंदेलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी अपंगना साहित्याचे वाटप करण्यात आले आहे 
ग्राम पंचायत कार्यालयात गावातील अपंग व्यक्तींना बोलावून त्यांना आवश्यकतेनुसार साहीत्य वाटप केले आहे.  या प्रसंगी सरपंच सौ.  वंदनाताई पोपलवार म्हणाल्या की, तालूक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निधी खेचून आणून गावाचा सर्वागीण विकास साधनार आहे

गावात मुलभूत सोयी, सुविधांवर भर देत दर्जेदार शिक्षण, आरोग्य, पाणी, विज या  सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे
गावकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार अशा त्या म्हणाल्या असल्या तरी टेंभीच्या ग्रामपंचायतने केले अपंगांना साहित्य वाटप आदर्श सरपंच व उपसरपंच ग्रामसेवकाचा आदर्श घेण्याची गरज आहे 

असे सांगताना सौ.पोपलवार म्हणाल्या की, अपंग व्यक्तीची गरज अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यांना आमच्या हातून साहित्याच्या माध्यमातून मिळवून दिलेली मदत खऱ्या अर्थाने आपलाला आनंद देणारी आहे.  असे सरपंच सौ.  पोपलवार म्हणाल्या यावेळी उपसरपंच प्रतिनीधी आनंद मुतनेपवाड,  कानबाराव पोपलवार,  शेषेराव पाटील,  अशोक पाटील यांच्यासह अपंग व्यक्तीची प्रामूख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments