Header Ads Widget

जेष्ठ नागरिक स्व.दिलीपराव उर्फ गणेशराव माने यांचे निधन अंत्यविधी २८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता बोरी येथे


हिमायतनगर नागोराव शिंदे 


बोरी (चा.) तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील दिलीपराव उर्फ गणेशराव आनंदराव पाटील माने भंडारकर वय ६० वर्ष यांचा दिनांक २७ फेब्रुवारी - २०२३ रोज सोमवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान अकस्मिक मृत्यू झाला त्यांची अंत्यविधी दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजता शोकाकुल वातावरणात करण्यात येणार आहे

आमचा विश्वास बसत नाही. जे नियतीला मान्य आहे तेच खरे होणार बोरी येथील प्रतिष्ठित नागरिक सदन कुटुंबातील व्यक्तिमत्व सर्वांना घेऊन सोबत चालणारे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे बोरी गावातील लहान थोर मंडळी त्यांना लहाने दादा या नावाने ओळखत होते पूर्णतः सेवाभावी वृत्ती मनमोकळ्या स्वभावाचा धनी आपल्यातून निघून गेला असल्याची ही दुःखत चर्चा आहे 

पूर्ण कुटुंबाने शिक्षण क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांना तीन मुली दोन मुलं नाती नातवंड असा मोठा परिवार असून त्यांची मुलगी सौ.ज्योती पाटील सौ.प्रीती पवार सौ.रेखा देवसरकर प्रा. योगेश माने डॉ. नागेश माने दोन्ही मुलं उच्चविद्या विभूषित झाली आहेत

असा एक गौरवशाली परिवाराचा संसार चालत असताना या संसार रथाचे चक्र एक ईश्वराने काढून घेतले व अवघ्या काही क्षणात परिवाराला दुबळे केले असेच म्हणवे लागेल या दुःखाच्या डोंगरात लोटले अतिशय वाईट घटना घडली या बोरी गावावर तथा माने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी असे अनेकातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत

Post a Comment

0 Comments