Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात.मा.आ.वसंतराव चव्हाणाच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे - सूत्र

       माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे बनवट लेटर पॅड तयार करून बदनामी करण्याचा कट रचणाऱ्यांच्या विरोधात तहसीलदाराना निवेदन देण्यात येणार असल्यामुळे प्रथम संपर्क कार्यालय येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे 

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांना निवेदन देण्यात येणार आहे

नायगाव उमरी धर्माबाद तालुक्याच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळी ठीक १० वाजता संपर्क कार्यालय नायगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाला तडा बसण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या लेटर पॅड वर बनावट लेटर पॅड तयार करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे

माजी मुख्यमंत्र्याच्या लेटर पॅड वर बनवट लेटर पॅड तयार करणाऱ्यांच्या विरोधात नायगावच्या तहसील कार्यालयावर तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आमदार वसंतराव चव्हाण संपर्क कार्यालय नायगाव यांच्या सूत्रांनी केले तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे ही माहिती आहे  


Post a Comment

0 Comments