Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे दोन तगडे भावी आमदार ?-

      माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा मा.सार्वजनिक बांधकाममंत्री व जिल्ह्याचे मा. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव येणाऱ्या काळात रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे

प्राध्यापक रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे उमरी येथील प्रसिद्ध उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी हे नायगाव विधानसभा मतदार संघात आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुकीतील दोन तगडे भावी आमदार ? असल्याची चर्चा सध्याच्या परिस्थितीत या मतदार संघात चर्चेला जात आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष उमरीचे प्रसिद्ध उद्योजक कवळे गुरुजी हे चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम संभाळले होते आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून विजय होऊन जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते

काही वर्षांच्या काळानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर पक्षाचे काम चांगल्या प्रकारे हाताळत आहेतआगामी काळातील विधान सभेच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून नायगावचे माजी आमदार पुत्र रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण हे सुद्धा विधान सभेची निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून त्याच बरोबर प्रसिद्ध उद्योजक कवळे गुरुजी हे सुद्धा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जंग करण्यासाठी आता पासूनच कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे
-----------------------------------------------------------------------
माजी आमदार पुत्राला चिल्याची माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह नामदार पटोले यांनी कामाला लागा असा हिरवा कंदील दाखविला असल्यामुळे प्राध्यापक रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण हे नायगाव विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले आहेत

त्याच बरोबर मा.आमदार पुत्र रवींद्र पाटील चव्हाण यांनी सुद्धा नायगाव मतदार संघ सर्व पिंजून काढला असल्यामुळे काँग्रेस पक्ष मात्र एक यातील भावी आमदार दोन असल्याची चर्चा मात्र नायगाव विधानसभा मतदार संघातील खेड्यापाड्यात ऐकावयास मिळत आहे

Post a Comment

0 Comments