Header Ads Widget

उमरखेड आगाराच्या ढाणकी पळसपुर मार्ग हिमायतनगर रेल्वे स्टेशन बस फेऱ्या सुरू


हिमायतनगर
:  नागोराव शिंदे - 

हिमायतनगर : राज्यापरिवहन महामंडळाच्या उमरखेड हिमायतनगर रेल्वे स्टेशन मार्गे  ढाणकी, गांजेगाव पळसपुर  ही बस सेवा प्रवाशाच्या सोयीचे होईल आणि एस .टी चे उत्पन ही वाढेल अशी अपेक्षा असे जनतेचे मत आहे

सदर उमरखेड येथुन सुटणारी फेरी संध्याकाळी ७ ३०  ढाणकी गाजेंगाव पळसपुर हिमायतनगर ही बस हिमायतनगर रेल्वे स्टेशन तसेच उमरखेड आगाराने सकाळी ७  ३० वाजता  ही पण  बस रेल्वे स्टेशन ला जाऊन येत आहे   

वरील मार्गावर लालपरि  चालवण्याचा धाडसी निर्णय उमरखेड आगार व्यवस्थापकांनी घेतला तसेच ढाणकी वरून दरोज सकाळी ४ .१५ मिनिटांनी सुटणारी ही बस गांजेगाव ,पळसुपुर रेल्वे स्टेशन हिमायतनगर सकाळी ०५ वाजता  जाऊन आदिलाबाद, परळी या पॅसेंजर व तिरुपती आदिलाबाद चे पॅसेंजर सोडवून घेऊन येते असा उपक्रम  आगार व्यवस्थापक यांनी राबविला आहे

सदरची बस चालू करण्यात आले असल्यामुळे या भागातील मोठ्या प्रमाणात सोयीस्कर फायदा होत असून सदरची बस चालू करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आगर व्यवस्थापकाकडे मागण्या लावून धरल्या होत्या - 

त्या मागण्याची दखल घेऊन सदरच्या कर्तव्यदक्ष आगर व्यवस्थापकांनी बस चालू करून या भागातील प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळली असल्यामुळे या विभागातून जनतेसह विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे 

त्या बदल माधवरा मिटकरे  प्रवासी मंडळ ढाणकी आध्यक्ष शेख ईरफान   हिरासिंग चेवान नागोराव शिंदे पळसपुरकर चांदराव वानखेडे व  सहकार्याच्या आतक प्रयत्नातून सदर बस सेवा  विभाग    नियंत्रक गोंजारी  आणि आगार व्यवस्थापक वावळे , तसेच आपले सहकारी वाहतुक निरिक्षक  सुरेश मोरे ,व उगले ,  त्यांचे सहकारी चालक वाहक यांची सर्व प्रवाशातुंन  अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments