Header Ads Widget

ठाणे येथे घेण्यात आलेल्या पोलीस भारतीच्या वेळीकुमारी श्रद्धा किशोर अण्णा चन्ने हिने ५० पैकी ४७ गुण मिळविले : सर्वत्र कौतुक !!🌹-

ठाणे :-  माधव पवार
कॉम्पुटर च्या युगात मुला पेक्षा मुली ही शिक्षण क्षेत्र असो की विविध माध्यमातून परीक्षा असो की स्पर्धा असो मुलापेक्षा मुलीने अतिशय कामगिरी करून बाजी मारत असल्यामुळे सर्वत्र मुलींचे अभिनंदन करण्यात येत आहे 

शासनाने महिलांना ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे मुलींचा विशेष गौरव करण्यात येतो तशाच पद्धतीने गौरव स्पद काम करणाऱ्या किशोर चन्ने यांची कुमारी मुलगी श्रद्धा किशोर अण्णा चन्ने हिने ठाणे येथे  घेण्यात आलेल्या पोलीस भरती मध्ये श्रद्धा चन्ने हिने ५० पैकी ४७  गुण मिळवले आहे
आई-वडिलांनी आपल्या मुलीला दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून पालकांचा आटापिटा असतो त्या गरिबीच्या माध्यमातून आपले पाले शिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अथवा खाजगी शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवतो आहोत

त्या शाळेतील विद्यार्थी असो की विद्यार्थीनी शाळेचे नाव व शिक्षकांचे नाव लौकीक करण्यासाठी मोठमोठ्या स्पर्धेत भाग घेतात गावासह शाळेचे नाव सुद्धा त्यांच्या माध्यमातून रोशन होते 
एका सामाजिक कार्यकर्त्यांची मुलगी असो की मुलगा आपल्या गरिबीचा सामना करीत उच्च शिक्षण घेतात त्यावेळेस त्यांच्या आई-वडिलांना शिक्षणाच्या खर्चासाठी नको ते कामे करावे लागत आहे 

व आपल्या पाल्याला पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या शाळेत शिकविण्याचा प्रयत्न करतो तशाच पद्धतीने संघर्ष अकॅडमी किन्हवली येथे प्रशिक्षण घेत असलेली कुमारी श्रद्धा किशोर चन्ने असून तिच्या शिक्षकासह श्रद्धांचे हार्दिक  अभिनंदन करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments