Header Ads Widget

महसूल प्रशासनाला माती उत्खलनात जबाबदार धरले जाते तर क्षमतेपेक्षा जास्त मातीची लोडिंग करणाऱ्या वहानावर कारवाई करण्यासाठी आरटीओची जबाबदारी नाही का ?

      माधव पवार
नायगाव तालुक्यात माती उत्खलनाच्या संदर्भात विविध विषयावर चर्चा होताना ऐकावयास मिळत असली तरी वर्तमानपत्राच्या माध्यमातून खमंग अशा पद्धतीच्या बातम्या प्रकाशित होताना दिसून येत आहेत
महसूल प्रशासनाला माती उत्खलनात जबाबदार धरल्या जाते तर क्षमतेपेक्षा जास्त मातीची लोडिंग करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी आरटीओ विभागाची जबाबदारी नाही का ? असा प्रश्न चर्चेला जात असून एवढी मोठी लोडींगची वाहतूक होत असताना आरटीओ विभागाचे अधिकारी झोपा काढतात का ? असा प्रश्न चर्चाला जात आहे
नायगाव तालुक्यातील काही भागात महसूल प्रशासनाने ठेकेदाराकडून पैसे भरून घेऊनच माती उत्खनन करण्यासाठी परवानगी देत असते परंतु ज्या हायवा टिप्पर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त मातीची लोडिंग केल्या जाते त्यावेळी आरटीओ विभाग चौकशी का करत नाही असा प्रश्न चर्चेला जात आहे

माती उत्खलनाच्या संदर्भात महसूल प्रशासनाला जबाबदार धरले जाते परंतु ज्यांचा अधिकार त्यांनी चांगल्या पद्धतीने निभावला तर अनेक गोष्टीला आळा बसतो तशाच पद्धतीने आरटीओ विभागाचे अधिकारी हायवा टिपर वहानाची कॉपीसिटी पाहून कारवाही केली तर क्षमतेपेक्षा जास्त लोडिंग करणे थांबेल असे ही जनतेतुन बोलल्या जाते आहे 

Post a Comment

0 Comments