Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शेतकरी नेते व भावी आमदार मारोतराव पाटील कवळे गुरुजीच्या अध्यक्षतेखाली पत्रकार बांधवाचा भव्य सत्कार सोहळा संपन्न


      माधव पवार
उमरी येथील काश्यप बुद्ध विहार येथे नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली उमरी येथील सर्व पत्रकार बांधवाचे सत्कार सोनू भाऊ वाघमारे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

यावेळी बोलताना माजी जि.प कवळे गुरुजी म्हणाले माझ्या सारख्या कार्यकर्त्याला जिल्ह्यासह राज्यभर ओळख निर्माण करून देण्याचं काम पत्रकारांनी केलंय तसेच जनसामान्यांसाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी राहण्याचे काम जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या पत्रकारांना केलंय असेच अन्याय विरुद्ध वाचा फोडण्याचे काम आपण सर्व पत्रकार बांधवांनी करावे असे प्रतिपादन पत्रकार सत्कार सोहळा प्रसंगी कवळे गुरुजी यांनी केलेसदरील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजयजी कुलकर्णी,काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेशराव पाटील सरसे,पत्रकार गिलचे सर उपस्थित होते.यावेळी पत्रकार बी.व्ही.चव्हाण,पत्रकार हुसेणी शेख,पत्रकार समद भाई,पत्रकार रीठेकर,पत्रकार प्रशांत जोंधळे,पत्रकार पांडुरंग सोनकांबळे,पत्रकार आदी उपस्थित होते 

उमरी येथील सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने तुपसाखरे,पत्रकार राहुल सोनकांबळे,पत्रकार प्रल्हाद हिवराळे,उद्धव मामडे,पत्रकार बंडू येमेवार,पत्रकार कैलास सोनकांबळे,पत्रकार साहेबराव सोनकांबळे पत्रकार फिरोज पटेल,पत्रकार पिराजी कऱ्हाडे,पत्रकार प्रकाश कार्लेकर,पत्रकार आनंद राठोड,पत्रकार आकाश सैदमवार,यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments