नायगाव तालुका मराठी पत्रकार संघांचे विद्यमान अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या डोळस विचारातुन नायगाव व बरबडा येथील पत्रकाराच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आहे
नायगाव येथील दैनिक गाववालाचे जेष्ठ पत्रकार माधव व्यंकटराव चव्हाण यांना नुकताच कै. दुर्गादास सराफ प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे व बरबडा येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार तथा छायाचित्रकार भगवान शेवाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चौधरी यांच्या कार्यलयात भव्य सत्कार करण्यात आला आहे
नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन नामांकित पत्रकाराचा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी पत्रकार बापूराव बडूरे पत्रकार रामप्रसाद चन्नावार पत्रकार माधव पवार पत्रकार साहेबराव साडे उद्धव धसाडे परमेश्वर पाटील जाधव बळीराम पाटील कदम यावेळी उपस्थित होते
नायगाव येथील रहिवासी असलेले व तालुका मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या कार्यालयात पत्रकार माधव चव्हाण यांना पुरस्कार जाहीर झाल्या बदल तर तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले पत्रकार भगवान शेवाळे यांच्या ३१ व्या वाढदिवसा निमित्त संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार चौधरी यांच्या वतीने सदरच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

0 Comments