Header Ads Widget

बरबडा - कुंटूर - सालेगाव रस्त्यासाठी १६ कोटी मंजूर : आमदार राजेश पवार यांच्या पाठपुराव्यास यश,

विशेष नायगाव / प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे : 

नायगाव तालुक्यातील जनतेला रस्त्याअभावी वर्षानुवर्षे होणारा वनवास आता काही दिवसात संपुष्टात येणार असून बरबडा - कुंटूर - सालेगाव रस्त्यासाठी १६ कोटी मंजूर करून आणल्याने दुर्गम अवस्था झालेल्या या रस्त्याची आमदार राजेश पवार यांच्या पुढाकारातून करण्यात आलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे,

तालुक्यात  अनेक  रस्त्यासाठी आ. राजेश पवार यांनी निधी खेचून आणला असून नागरिकांनी अनेक वेळा या रस्त्याची मागणी केल्याने राजेश पवार  यांनी पाठपुरावा केला.त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य "महामार्गापासून २४०० मीटर पुढील रस्त्यासाठी आता मंजुरी मिळाली असून या रस्त्यासाठी १६ कोटीचा निधी प्राप्त झाला असल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 
 
शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक पत्र नांदेडच्या अधीक्षक अभियंत्याकडे पाठविण्यात आल्याने याबाबत निविदा जारी करून प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
   
एकेकाळी बरबड्याशी आजूबाजूच्या खेड्यापाड्यांचा मोठा संबंध येत होता. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत होती. कालांतराने गोदावरी नदीवर झालेल्या बंधाऱ्यामुळे अनेक गावांचा संबंध तुटला. याचा फटका बरबड्याला बसला. परंतु मागील २० वर्षापासून नजरेआड गेलेल्या या भागाची रस्त्याअभावी मोठी वाताहत झाली. ती गावे देखील रस्त्यामुळे दुरावली होती.या कामाला आ.पवार यांच्या मुळे यश आले

या रस्त्याच्या कामासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या भागाचे आ. राजेश पवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे १७ ऑगस्ट रोजी दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

त्यांच्या या मागणीला उत्तर देताना महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत विभागाकडून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड येथील मुख्य अभियंतांना या रस्त्याच्या कामासाठी २०२२-२३ मधील रस्ते, पुल परीक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत तात्काळ कार्यवाही करून हे काम लवकर मार्गी लावण्याचा सूचना दिल्या आहेत.    

यासाठी १६ कोटी रुपये मंजूरही झाले आहेत. त्यामुळे बरबडा,कुंटुर,सालेगाव  च्या नाग्रीनकाची रस्त्याअभावी होणारी फरफट आता मिटणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे..

Post a Comment

0 Comments