Header Ads Widget

हिमायतनगरमध्ये चालणाऱ्या काटेवाले यांच्या बोगस पॅथॉलॉजी लॅबचि चौकशी करा; अन्यथा आंदोलन छडू - रामभाऊ सूर्यवंशी यांचा इशारा -


हिमायतनगर : नागोराव शिंदे :- 

शहरात गेल्या काही वर्षापासून अधिकृत परवाना नसताना पॅथॉलॉजी लॅब चालवीण्याचा गोरखधंदा सुरू करून रुग्णाच्या जीवाशी खेळ चालविला जात आहे. 

या प्रकारामुळे अनेक रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. हिमायतनगर शहरात चालणाऱ्या अश्या बोगस लॅब चालकांवर कार्यवाही करावी त्यात काटेवाले यांच्या लॅब सुरू झाल्यापासून चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देऊन केली आहेयास महिन्याभराचा कालावधी लोटला असताना अद्यापही आरोग्य विभागाने बोगस लॅबचालकांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्यामुळे या लॅब चालकांना आरोग्य अधिकारी पाठबळ देत आहेत का.? असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

तात्काळ बोगस लॅब चालकाचे परवाने करून कार्यवाही करावी. अन्यथा रुग्णाच्या जीवाशी खेळ चालवीत रक्त तपासणीच्या नावाखाली लूट करणाऱ्या लैब चालकावर आणि  त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यातील येईल असा इशाराही त्यांनी नायगाव फास्ट न्यूजशि बोलतांना दिला आहे
याबाबत दिलेलता तक्रारीनुसार सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर व तालुका आजही अविकसित आणि ग्रामीण आदिवासी बहुल भाग आहे. शासन स्तवराऊन शासकीय रुग्णालयात मोफत सुविधा मिळते. मात्र त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या रक्त तपासणीमध्ये अनियमितता दिसते आहे.

त्यामुळे बहुतांश नागरिक हे आपल्या अर्पग्याची काळजी घेण्यासाठी आणि योग्य उपचार मिळावा म्हणून शहरात थाटण्यात आलेल्या खाजगी पैथोलॉजी लैबवर रक्त तपासणी करण्यासाठी जातात. पर्णातू शहरात एक - दोन सॊडले तर थाटण्यात आलेल्या विविध पॅथाॅलाॅजी लॅब ह्या अनधिकृत आहेत.
कारण त्या लैबला पॅरावैद्यकीय कौन्सिलची परवानगी नसलेल्या व्यक्तीकडून चालविली जात आहेत. त्यामुळे रक्त तपासणीच्या रिपोर्टवर अधिकृत व्यक्तीऐऐवजी अन्य व्यक्तीच्या स्वाक्षरीने रिपोर्ट दिला जात आहे.

 या ठिकाणी घेतलेले रक्ताचा रिपोर्ट नांदेडचे अनेक डॉक्टर्स स्वीकारत नसल्याने रुग्णांना नावायने रक्ततपासणी करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. तर काहीजणांना या चुकीच्या रिपोर्टमुळे आपल्या आरोग्यावर होत असलेल्या चुकीच्या उपचाराचा सामना करावा लागतो आहे.सर्व जनतेला गुणवत्तापूर्ण पैरावैद्यकीय सेवा वाजवी दारात व योग्य वेळेवर मिळावी व बोगस पैरावैद्यकीय व्यवसायी व्यक्तीवर अंकुश राहावा यासाठी महाराष्ट्र राज्यात ३१ जुलिया २०१७ पासून राष्ट्रपती भारत सरकार यांच्या मंजुरीनुसार स्वाक्षरीसहित महाराष्ट्र पैरावैद्यकीय परिषद अधिनियम २०११ लागू झाला आहे.

 त्यानुसार परिषदेचे नियमित कामकाज देखील सुरु असतानाही हिमायतनगर शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांची अव्वाच्या सव्वा दराने फीस घेऊन आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे पैरावैद्यकीय सेवेच्या नावाखाली बोगस डिग्रीधारक व लैब टेक्नीशियन मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

 

Post a Comment

0 Comments