Header Ads Widget

चिंचाळा ग्रामपंचायत कार्यालयात महिला राज सरपंच व उपसरपंचाची निवड गावच्या विकास कामाला प्रधान्य देऊ - सौ रत्नमालाबाई पवार

भोकर प्रतिनिधी : विजय कुमार पाटील मोरे

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील चिंचाळा ग्रामपंचायत कार्यालयात नूतन सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आले असल्यामुळे या गावच्या महिला सरपंच झाले असल्यामुळे गावात महिला राज आले आहें
गावच्या सकारात्मक विकास करण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून प्रधान्य देऊ असे गावच्या महिला सरपंच सौ रत्नमालाबाई केशवराव पवार यांच्या उपसरपंच संतोष
 गंगाधरराव पाटील ढवळे यांनी सांगितले आहे
-------------------------------------------------------------------
भोकर तालुक्यातील चिंचाळा गावातील दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबाला शासनाकडून येणाऱ्या घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही नूतन महिला सरपंच यांनी सांगितले आहेत

 "चिंचाळा ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतन विद्यमान सदस्य "

सौ.नंदाबाई सुदाम पाटील ढवळे राजू पुंडलिकराव पाटील कदम सौ.भाग्यश्रीबाई हनुमंतराव कदम पाटील सौ.रंजनाबाई साहेबराव मोरे यांना गावकऱ्याच्या वतीने निवडीच्या शुभेच्छा !
तालुक्यातील चिंचाळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या नाली बांधकामाचा प्रश्न असेल लाईट पाण्याची व्यवस्था करण्यासाठी माझी ग्रामपंचायत सज्ज असल्याचे सांगत गावच्या विकासाचा गाडा पुढे पुढे ढकलण्यासाठी सरपंच व उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य एकत्रपणे गावच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले आहें

गावच्या विकास कामाला मोठ्या प्रमाणात प्रधान्य देऊन सदरचा विकास गावातील सुज्ञान नागरिकांच्या समोर ठेवण्यासाठी माझे प्रयत्न असतील असेही नूतन महिला सरपंच सौ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहेत 

Post a Comment

0 Comments