वडिलांनी देशाची सेवा केली बहिणीने एनसीसीच्या माध्यमातून उत्तम कामगिरी करून एअर फोर्समधून करीअरला सुरुवात केली. त्यामुळे आपणही देशाची सेवा करावी या उदात्त हेतूने दिल्लीच्या राजपथावर संचलन करावे असे स्वप्न उराशी बाळगून अनमोल आनंदा जाधव या रानसुगाव ता.नायगावच्या शेतकरी पुत्र असलेल्या विद्यार्थ्यांनी अति पराकाष्टा केली आहे
मात्र त्याचे नाव अंतिम यादीत न येता प्रतीक्षा यादीत आले. तो निराश झाला. परंतु नियतीने असे काही चक्र फिरवले की, अखेर त्याचे नाव अंतिम यादीत आल्याने त्याचे स्वप्न पूर्ण झाले.
प्रजासताकदिनाच्या निमिताने दरवर्षी २६ जानेवारी रोजी देशभरातील काही निवडक विद्यार्थ्यांना दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभागी होण्याची संधी प्राप्त होते
देशातील विविध विद्यालय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या 'एनएसएस' व 'एनसीसी'च्या विद्यार्थ्यांची राजपथावरच संचलन करण्या साठी निवड करण्याच्या माध्यमातून आपलीकला सादर करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.त्यासाठी विद्यर्थ्याची निवड केली जाते परंतु यासाठी अनेक चाचणीतून आणि प्रक्रियेतून जावे लागते.
४५ जन या प्रक्रियेत असताना. केवळ दोन विद्यार्थ्याची निवड या संचलना साठी राज्यातून झाली आहे. यात अनमोल जाधवला संधी मिळाली हे विशेष आहे.पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधील विद्यार्थी अनमोल आणि त्याचबरोबर डॉ. बी. एन. पुरंदरे आर्टस ,एस. जी. गुप्तां आदी कॉलेजचा या मध्ये समावेश होता. यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्तरावरील चाचणी परीक्षा मधून जावे लागले. जिल्हास्तरावरील निवड शिविर घेण्यात आले. त्यानंतर विद्यापीठस्तरावरील शिबिर कोल्हापूर विद्यापीठात पार पडले
राज्य स्तरावर निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना गुजरात के विभागीय शिबीरात पाठवण्यात आले. त्यानंतर राज्यातून जयवंत व अनमोल आनंदा जाधव रा रानसुगाव ता नायगाव या दोहोनी हे स्वप्न साकार करण्यासाठी सुमारे वर्षभरापूर्वीच सराव सुरू केला. जिल्हास्तरापासून विभागीय स्तरावरील शिविरात चांगली कामगिरी केल्यामुळे एनआरडी कैम्पसाठी निवडलेल्या या दोहोनी पंथ संचलनात स्थान मिळविले.
" माझ्या अपूर्ण स्वप्नाची पूर्तता मुलांनी पूर्ण केली"
"" पालक आनंदा जाधव रानसुगावकर ""
आपल्या मुलाने काही तरी करूनहीही संधी पूर्ण साकारावी अशी माझी मनोमन इच्छा होती ती मुलीने एअरफोर्स मध्ये भरती होऊन व मुलाने पंथ संचलनात सहभागी होऊन पूर्ण केली आहे.माझ्या स्वप्नाची पूर्तता मुलगी व मुलांनी केली यातच माझा आनंद आहे
अशी प्रतिक्रिया रानसुगाव येथील मूळ रहिवाशी पण सध्या पुणे येथे वस्तव्यास असणारे आनंदा जाधव यानी नायगाव फास्ट न्यूजज प्रतिनिधींशी बोलताना दिली.
अनमोलचे वडील आनंदा जाधव हे सैनिक आहेत त्यांनी एनसीसी चे संचलन केले आहे. सध्या ते कार्यरत आहेत.या मुळे अनमोलला देश सेवेत भरती होण्याची आवड निर्माण झाली.अखेर त्याने आपले वडीलाच अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे.अनमोलच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0 Comments